Liquor seized । सीमा तपासणी नाक्यावर पावणे नऊ लाखांचा मद्यसाठा जाप्त

Liquor seized । धुळे : नाताळ आणि नविन वर्षाच्या (Christmas and New Year) पार्श्वभूमिर मद्याची बेकायदा विक्री व वाहतुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमा तपासणी नाक्यांवर कडक केली आहे. संशयित वाहनांची झडती घेतली जात आहे. शनिवारी रात्री मध्यप्रदेशातून धुळे जिल्ह्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर (At Hadakhed border check post in Dhule district) एका महिंद्र बोलेरो पिकअप वाहानासह सुमारे आठ लाख 71 हजार 600 रुपयांचा मद्यसाठी मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. (Nine lakh liquor seized at border check post)

New Year’s celebrations । नाताळ आणि नवीन वर्षाच्या सिलिब्रेशनवर निर्बंधाची टांगती तलवार

पथकाला हाडाखेड (ता.शिरपूर, जि. धुळे) तापासणी नाक्यावरुन विनापरवाना मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त महिती मिळाली होती. त्यानुसार संशयित MH- 48 – T -4360 क्रामांच्या वाहन चालकाला थाबंण्याचा पथकाने इशारा केला. त्यावेळी चालकाला संशय आल्याने काही अंतरावरच वाहन थांबवून पळ काढला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये गोवा व्हिस्की १८० मिली. क्षमतेच्या २ हजार ५०० बाटल्या (मध्यप्रदेश राज्यात निर्मित व विक्रीकरिता सेवन असलेले) त्याची किंमत ९६ हजार ६०० रुपये, पॉवर १०००० बिअरचे ८४० टीन ज्याची किंमत ४ लाख ५०,००० हजार रुपये आणि सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण अंदाजे ८ लाख ७१ हजार ६०० हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. (Nine lakh liquor seized at border check post)

Nine lakh liquor seized at border check post
Nine lakh liquor seized at border check post

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (State Excise Commissioner Kantilal Umap), नाशिक विभागाचे उपायुक्त अर्जुन ओव्हाळ (Nashik Division Deputy Commissioner Arjun Oval), नाशिकच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापुसाहेब महाडीक यांच्या पथकाने केली. या पथकात दुय्यम निरीक्षक अतुल शिंदे. जवान एन.व्ही. ढगे, केतन जाधव, अमोल धनगर, मनोज धुळेकर, वाहन तालक रविंद्र देसले यांचा समावेश होता. (Nine lakh liquor seized at border check post)

 

ओमायक्रॉनचा धोका : पुणे शहरासह जिल्ह्यात निर्बंधात वाढ

Pune Crime। कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतीचे भासवून विकणारा गजाआड ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Local ad 1