...

दलित,आदिवासी उद्योजक मोठ्या प्रमाणात घडवण्यासाठी डिक्कीला प्रोत्साहन देऊ : किरेन रिजिजू

पुणे.  गेल्या वीस वर्षात दलित इंडियन  चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) ने उद्योग विश्वात चांगले काम करत आहे. आता देशभरतील गावो-गावी आणि पूर्व भागातील आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) (Dalit Indian Chamber of Commerce and Industry) ने पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे प्रोत्साहन देऊन ,सहकार्य करु, असे अश्वासन  केंद्रीय अल्पसंख्याक व संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू (Union Minorities and Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju) यांनी दिले आहे. ते पुण्यात सोमवारी दलित उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Let’s encourage Dikki to create Dalit, tribal entrepreneurs : Kiren Rijiju)

रिजिजू म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ होते .त्यामुळे त्यांचा इतर कार्बयारोबरच अर्थशास्त्राचे विचार आणि धोरण  ही सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. डिक्कीच्या कार्याचे त्यांनी कौतुक करुन डिक्कीच्या देशभरातील कार्यासाठी आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, असे अश्वाशन दिले.
Dalit Indian Chamber of Commerce and Industry

यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स  अँड इंडस्ट्री (डिक्की ) च्या वतीने किरेन रिजीजू यांचे स्वागत संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले.  पुणे विभागाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चा प्रवास आणि आजपर्यंत केलेल्या विविध कार्याचे स्वरूप यावेळी सांगितला.

या कार्यक्रमास पद्मश्री मिलिंद कांबळे ,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, डिक्कीचे सल्लागार सचिन वाणी, पश्चिम भारताचे अध्यक्ष अविनाश जगताप, महिला समन्वयक सीमा कांबळे, पुणे अध्यक्ष ललित बन्सोड, तसेच पुणे विभागातील प्रमुख दलित उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन मैत्रेयी  कांबळे तर आभार ललित बन्सोड यांनी मानले.

Local ad 1