विधानसभेचे उपअध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासाह काही आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी ; काय आहे कारण जाणून घ्या 

 

मुंबई  :  सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Jhirwal, Vice President of Legislative Assembly) यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या आहेत, आशी माहिती समोर येत आहे. (Legislative Assembly Deputy Speaker Narahari Jirwal, along with some MLAs jumped the net in the ministry)

 

 

गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले.

 

आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर (MLA Kiran Lahamte, Hemant Savara, Kashiram Kotkar) यांचा समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे करिण लहामटे यांनी म्हटले.

 

Local ad 1