महाविकास आघाडीतील ‘हे’ नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

Bharat Jodo Yatra : भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून नांदेडमधून या यात्रेचा प्रवास सुरु झाला आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सहभागाविषयी साशंकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  (Leaders of Mahavikas Aghadi will participate in Bharat Jodo Yatra)

 

 

Bharat Jodo Yatra । भारत जोडो यात्रेचे देगलूर मध्ये होणार स्वागत

 

 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Rahul Gandhi’s bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली असून, सध्या वाझरगा येथे पोहोचली आहे. पदयात्रेत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभागी झाले आहेत. कॉंग्रेससोडून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते  या यात्रेमध्ये सामील होणार यावर चर्चा सुरू आहे. (Leaders of Mahavikas Aghadi will participate in Bharat Jodo Yatra)

 

 

 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीकडून 10 नोव्हेंबरला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सहभागी होणार आहेत. तर राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे भारत जोडो यात्रा बुलढाणा येथे आल्यानंतर आपला सहभाग नोंदवणार आहे. आमदार रोहित पवार देखील हिंगोली येथ राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

दरम्यान, उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार की, नाही याविषयी अजूनही साशंकता आहे. शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे होतील, अशी माहिती दिली आहे. मात्र, कोणत्या ठिकाणी ते सहभागी होतील याविषयी स्पष्ट केलेले नाही. (Leaders of Mahavikas Aghadi will participate in Bharat Jodo Yatra)

 

 

  •  देगलूर येथे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नांदेड येथील नेते उपस्थित होते. त्यात माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. (Leaders of Mahavikas Aghadi will participate in Bharat Jodo Yatra)

 

Local ad 1