MH टाईम्स वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात वांग्याच्या पिकात गांजाची शेती होत असल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी एलसीबीने उघडकीस आणला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हरनाळा भागातून उघडकीस आली आहे. या कारवाईत तब्बल 03 लाख रूपये किमतीचे सुमारे 62 किलो वजनाची 38 गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलिसांनी शेतकऱ्यांला ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस उप निरिक्षक सचिन सोनवणे यांनी दिली आहे.(LCB destroys cannabis cultivation in Naigaon taluka)
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर 36 मधील शेतात त्याने वांग्याचे पिक घेतले होते. याच शेतात त्याने गांज्याची लागवड केली होती. याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या टिमला मिळाली होती. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (ता.22) रोजी हरनाळा शिवारात धाड मारली. या धाडीत पोलिसांना वांग्याच्या पिकात गांज्याची 38 झाडे लावल्याचे दिसून आले. (Baliram Gangaram Ghorpade, a farmer from Raher in Naigaon taluka of Nanded district, had planted cannabis in an eggplant crop in a field in gat No. 36 at Harnala in Biloli taluka. This was reported to the team of Dwarkadas Chikhlikar, a police inspector of the local criminal investigation department. Under the guidance of Chikhlikar, a team of Sub-Inspector of Police Sachin Sonawane raided Harnala Shivara on 22nd. During the raid, police found 38 cannabis plants in the eggplant crop.)
यावेळी बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 03 लाख रुपये किमतीचे 62 किलो वजनाची 38 गांज्याची झाडे जप्त केली. यावेळी गांजा उत्पादक शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे याला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेका दशरथ जाभळीकर, मारोती करले, तेंलग, रणधीर राजवंशी, मोतीराम पवार, विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण आदींचा समावेश होता अशी माहिती पोलीस उप निरीक्षक सोनवणे यांनी दिली.