पुणे : Pune Contruction Engineering Research Foundation (PCERF) व त्यांचे सहयोगी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांचे संयुक्त विद्यमाने जानेवारी 12-15-2023 या दरम्यान Constro 2023Constro 2023 International expo या निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मोशी येथील अद्यावत Pune International Exhibition and convention centre येथे आयोजित केले जात आहे. प्रदर्शन 30000 चौ.मी.क्षेत्रावर उभारले आहे. प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू,उपकरणे,प्रणाली व तंत्रज्ञान यांची माहीती मिळेल. (Kronstro 2023 exhibition at PMRDA’s Moshi Exhibition Centre)
प्रदर्शन हे निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी आहे.सदर प्रदर्शनास राज्यातील निर्माण क्षेत्रात कार्यरत असणारे व्यावसायिक भेट देतील.तसेच वस्तू रचना व स्थापत्य शास्त्र चे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात भेट देतील.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने निर्माण क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर सर्व दिवस चर्चा सत्र आयोजित केलेली आहे.ज्या मध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे विचार मांडतील.प्रदर्शनात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देण्याची साठी व्यवस्था केलेली आहे.तिथे सुरक्षे विषयी प्रात्यक्षिकही केले जाईल.
प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक् निमेश पटेल व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)चे आयुक्त राहुल महिवाल (Rahul Mahival IAS) यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. (Kronstro 2023 exhibition at PMRDA’s Moshi Exhibition Centre)
प्रदर्शनाच्या वेळी Virtual Constro Exhibition चे ही उद्घाटन होईल. उद्घाटनाची कार्यक्रम 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित केला आहे. (Kronstro 2023 exhibition at PMRDA’s Moshi Exhibition Centre)
नोंदणी साठी लिंक : https://constro.greenpass.com/#/