...

‘वीजबिल थकबाकीमुक्तीसह ग्रामविकासात आमचाही हातभार’ (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)

पुणे : ‘कृषिपंपाच्या अनेक वर्षांच्या थकीत वीजबिलांतून मुक्तता झाल्याच्या आनंदासह वीजबिलांच्या भरण्यातून गाव व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावल्याचे मोठे समाधान आहे. थकबाकीमध्ये 66 टक्के सूट, मागेल त्यांना कृषिपंपांची नवीन वीजजोडणी (agriculture electricity connection), सौर ऊर्जेद्वारे कृषिपंपांना (agriculture solar system) दिवसा वीजपुरवठा या तरतुदी खरोखरच कृषिक्षेत्रातील नवे पर्व निर्माण करणार्‍या आहेत’ असे प्रातिनिधीक मनोगत हवेली, जुन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांनी महावितरणकडून आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)
https://bit.ly/3c1zQIk 


कृषिपंपांच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त झालेले श्यामराव गणपत गायकवाड, लक्ष्मण दगडू गायकवाड, लिलाबाई अरुण घुले, केरबा दगडू गायकवाड, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे (मुळशी विभाग) तसेच कृषिपंपांची नवीन वीजजोडणी मिळालेले जिजाबाई साधू येवले, बाळासाहेब विठ्ठल जगताप, नितीन मुरलीधर काजळे, पूजा संभाजी बुट्टे (मंचर विभाग) यांचा महावितरणच्या वतीने सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी केले तर कार्यकारी अभियंता किरण सरोदे यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंदेले, हेमचंद्र नारखेडे, संतोष गरूड तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)

 

‘प्रकाशभवन’मध्ये ऊर्जा विभागाच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’ला (krishi urja parva in the state farmer power-connection) पुणे परिमंडलात सुरवात करण्यात आली. कोविड-19 चे नियम पाळून आयोजित या कार्यक्रमात प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, शंकर तायडे, महाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण यांच्यासह जुन्नर व हवेली तालुक्यातील प्रातिनिधीक लाभार्थी शेतकर्‍यांची उपस्थिती होती. (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (dr. nitin raut electricity minister of maharashtra) यांच्या पुढाकाराने कृषिक्षेत्रासाठी प्रथमच व स्वतंत्र ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वीजबिल (agriculture electricity connection) थकबाकीमुक्तीसह पाहिजे तेव्हा नवीन वीजजोडणी तसेच बिल भरलेल्या रकमेतील 66 टक्के हक्काच्या निधीतून गाव, जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावण्याची संधी शेतकर्‍यांना उपलब्ध झाली आहे. या ऐतिहासिक धोरणाचा व संधीचा सर्व शेतकर्‍यांनी जरुर फायदा घ्यावा. त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ‘कृषी ऊर्जा पर्व’ सुरु करण्यात आले आहे असे प्रतिपादन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले. (government of maharashtra launches krishi pump-yojana for farmers agriculture-solar system)

Local ad 1