...

(St bus) कौठा मार्गे मुखेड -नादेड बससेवेचा पुनश्च हरिओम

कंधार ः  कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याने पुनश्च हरिओम म्हणून (ब्रेक द चैन) लाॅकडाऊनमधील बंधने शिथिल केली जात आहेत. त्यात बंद असलेली बससेवा करण्याची मागणी कंधार तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आगार प्रमुख्यांना करण्यात आली होती. त्याची दखल घेत मुखेड-कौठा-हळदा- नांदेड ही बससेवा सुरु झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रशांची सोय झाली आहे. koutha rut mukhed halad nanded st bus start


  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या सेवेत असलेले लालपरीची सेवा खंडीत करण्यात आली होती. ब्रेक द चैन अंतर्गत कौठा मार्ग धावणाऱ्या नादेड -मुखेड व नांदेड -टेभुर्णी  या मार्गावर सुरु  असलेली बससवेवा पूर्णतः बंद होती. त्यातच खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बी-बियाने, रासायनिक खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना नांदेड किंवा मुखेड या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु बससेवा बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत होती. ही बाब  भाजपा युवा मोर्चाचे कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी मुखेड व नांदेड आगार प्रमुखांना बससेवा पुर्ववतत सुरु करण्याची गरज असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले.


बससेवा पुर्ववत सुरु झाल्याने डाॅ.नागेश देशमुख, जनता हायस्कुलचे मुख्याध्यापक अंनत नारलावार, ज्ञानेश्वर कोत्तावार, शिवकुमार स्वामी, नुरोद्दिन सय्यद, महेश कोत्तावार, अशिष उपलंचवार, आमोल सुडंगे, योगेश देशमुख, डाॅ. शिध्देश्वर मुद्दे, डाॅ. धोडीबा महाजन, किशन शिवशेट्टे व अकुश जाधव यानी स्वागत केले आहे.  koutha rut mukhed halad nanded st bus start

उस्मानगर-कौठा -मुखेड या राष्ट्रीय महामार्गावर सध्या एकही बस धावत नाही यामार्गावर शासनाने २२५ कोटी रुपय खर्च करण रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. प्रत्येक गाव मुख्य रस्त्यावर आले असुन, नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर नादेड- उस्मानगर – शिराठोण – हाळदा – कौठा मार्ग  बस सुरुवात करण्याची मागणी साईनाथ कोळगिरे यांनी केली.  koutha rut mukhed halad nanded st bus start

Local ad 1