Koregaon Bhima Vijay Stambh ।कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनाला सुरुवात

Koregaon Bhima Vijay Stambh। कोरेगाव भीमा येथील विजयीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा 30 अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा 31 डिसेंबरपासूनच अभिवानाला सुरुवात करण्यात आली.

Koregaon Bhima Vijay Stambh । पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा 30 अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा 31 डिसेंबरपासूनच अभिवानाला सुरुवात करण्यात आली. रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून अभिवादन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे (Koregaon Bhima Vijayastambh Shaurya Day Coordination Committee President Rahul Dambale) यांनी दिली. (Koregaon Bhima Vijay Stambh Salutation begins)

 

 

वर्धा, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या समवेतच कर्नाटक उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल झाले आहेत. एक जानेवारी रोजी पुरवण्यात येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात आल्या आहेत. विजयस्तंभ संपूर्ण सजावटीसह रविवारी पहाटेच अभिवादनासाठी खुला करून देण्यात आला आहे.

 

आकर्षक सजावट व त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गर्दी शिवाय सुटसुटीत वातावरणात अभिवादन करता येत असल्यामुळे जेष्ठ नागरिक व महिलांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहे, असे राहुल डंबाळे यांनी सांगितले. यावेळी समन्वय समितीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

 

Koregaon Bhima Vijay Stambh Salutation begins

पुढील दोन वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी विजय स्तंभास भेट दिलेल्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने 2027 मोठ्या प्रमाणात देशभरातील अनुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. बाबासाहेबांच्या विजयस्तंभ भेटीच्या शताब्दीची पूर्वतयारी म्हणूनच यावर्षीपासून सर्व नियोजन करण्यात येत असल्याचेही डंबाळे यांनी सांगितले.

 

सोमवारी (१ जानेवारी) उच्चांकी गर्दी होणार असून, अनुयांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. अत्यंत शिस्त व संयमी पद्धतीने यंदाचा अभिवादन सोहळा पार पडणार असल्याने कोणत्याही अफवांना बळी न पडता भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादनासाठी यावे, असे आवाहन राहुल डंबाळे यांनी केले.

 

Local ad 1