konkan flood 2021| तळीये गावातील बचावकार्य थाबविले, अजूनही 31 जण बेपत्ता
konkan flood 2021| अलिबाग : महाड तालुक्यातील तळीये गाव (दि.२२ जुलै) अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. रविवारपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Fifty-three bodies were exhumed from the rubble) मात्र आज चौथ्या दिवशी सकाळी बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप ३१ जण बेपत्ता असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. (Rescue operations in Taliye village halted, 31 still missing)
konkan flood 2021| दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 53 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले आहेत. तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरुच होता. मात्र तीन दिवसांच्या शोध कार्यानंतर दरडीखाली कोणी जिवंत आढळून येईल, याची खात्री नसल्याने एकूण परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी, प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ पथकांचे मत आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे नातेवाईक या सर्वांशी चर्चाविनिमय करुन आज हे बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
konkan flood 2021| रविवारपर्यंत दरडीच्या ढिगाऱ्याखालून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर 5 जण जखमी अवस्थेत सापडले आहेत. मात्र या दुर्घटनेतील 31 जणांना रोजी बेपत्ता घोषित करण्यात आले आहेत. या बेपत्ता व्यक्तींबाबत शासनास अहवाल सादर करण्यात येईल व त्यानुषंगाने शासनाचे आदेश प्राप्त करुन अशा बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींचा शोध लागू शकला नाही किंवा त्यांचे शवही सापडले नाही, अशा बेपत्ता व्यक्तींच्या वारसास शासन धोरणानुसार सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री आदिती तटकरे (Guardian Minister Aditi Tatkare) यांनी शासनास केली आहे.
या दुर्घटनेतील जखमी अवस्थेत सापडलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे- स्वप्नील धोंडीराम शिरावले (वय 40), संगीता संजय कोंढाळकर (50), स्वाती संजय कोंढाळकर (25), हंसाबाई ऊर्फ रेश्मा चंद्रकांत कोंढाळकर (46), अनिल सखाराम गंगावणे (35) यांचा समावेश आहे.
दुर्घटनेतील 53 मृत व्यक्ती –
1) बाळू महादू यादव-75, 2) कृष्णाबाई बाळू यादव-70, 3) गुणाची बाळू यादव-30, 4) दिपाली गुणाजी यादव-30, 5) अवनी सुनील शिरावले-5, 6) पार्थ सुनील शिरावले-1, 7) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर-45, 8) लक्ष्मण रावजी यादव-70, 9) श्याम श्रीपत यादव-75, 10) देवेंद्र श्याम यादव-38, 11) दिपाली देवेंद्र यादव-35, 12) अलका भीमसेन शिरावले-50, 13) आयुष भीमसेन शिरावले-12, 14) दिपाली भीमसेन शिरावले-17, 15) देवकाबाई बापू सपकाळ-72, 16) भरत तुळशीराम शिरावले-25, 17) निकिता भरत शिरावले-23, 18) केशव बाबुराव पांडे-70, 19) रेशमा विजय पांडे-28, 20) मनाली विजय पांडे-7, 21) उषा पांडुरंग कोंढाळकर-80, 22) संजय बापू कोंढाळकर-55, 23) अजित ज्ञानेश्वर कोंडाळकर-22, 24) अभिजीत ज्ञानेश्वर कोंडाळकर-20, 25) मंजुळा गणपत गायकवाड -70, 26) प्रविण किसन मालुसरे-25, 27) अनिता उर्फ मंदा संपत पोळ-50, 28) ऋषिकेश चंद्रकांत कोंढाळकर-25, 29) अश्विनी अमोल कोंढाळकर-25,
30) संकेत दत्ताराम जाधव-25, 31) सानिका संकेत जाधव-22, 32) द्रौपदी गणपत धुमाळ-70, 33) धोंडीराम लक्ष्मण शेडगे-65, 34) दैवत शंकर कोंडाळकर-65, 35) गणपत केदारी जाधव-85, 36) इशांत देवेंद्र यादव-10, 37) विघ्नेश विजय पांडे-5 महिने, 38) करण देवेंद्र यादव-8, 39) लिलाबाई यशवंत कोंढाळकर-65, 40) किसन काशीराम मालुसरे-55, 41) बाबू धोंडु सकपाळ-75, 42) संपत कुशाबा पोळ-55, 43) विमल तुळशीराम शिरावळे-65, 44) इंदीराबाई शांताराम शिरावळे-62, 45)अंजीराबाई बापू कोंढाळकर-62, 46) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर-75, 47) सुगंधा ज्ञानेश्वर कोंढाळकर-37, 48) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर-70, 49) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर-44, 50) विजय बाळकृष्ण साळुंखे-25, 51) निराबाई शिवराम कोंढाळकर-65, 52) सुनंदा विठ्ठल जाधव-50, 53) भाविका नारायण निकम-15
बेपत्ता असलेल्या व्यक्ती
1) प्रविणा सुनिल शिरावले-30, 2) आशा बाळकृष्ण कोंढाळकर-40, 3) राहुल बाळकृष्ण कोंढाळकर-23,4) पुष्पा लक्ष्मण यादव-65, 5) तुळशीराम बाबू शिरावले-70, 6) सुरज तुळशीराम शिरावले- 27, 7) हौसाबाई केशव पांडे-65,8) शांताराम गंगाराम शिरावले-75, 9) ज्ञानेश्वर तुकाराम कोंढाळकर-55, 10) मधुकर तुकाराम कोंढाळकर-54,11) तानुबाई रामचंद्र साळंखे- 75, 12) यशवंत रामचंद्र कोंढाळकर-65, 13) गणपत तानाजी गायकवाड-75,14) शिवराम सिताराम कोंढाळकर-70, 15) शांताबाई काशीराम मालुसरे-75, 16) कांता किसन मालुसरे-50, 17) विद्या किसन मालुसरे-22,18) चंद्रकांत बापू कोंढाळकर-50, 19) तन्वी चंद्रकांत कोंढाळकर -12,
20) स्वरूपा चंद्रकांत कोंढाळकर- 10,21) पांडुरंग तात्याबा कोंढाळकर-60, 22) काजल पांडुरंग कोंढाळकर-22, 23) सान्वी संकेत जाधव-1, 24) रामचंद्र बाळकृष्ण जाधव-70,25) सुशिला रामचंद्र जाधव-65, 26) रमेश रामचंद्र जाधव-40, 27) प्रदीप रामचंद्र जाधव-29, 28) रविंद्र रामचंद्र जाधव-26,29) राधाबाई देवजी जाधव-80, 30) निराबाई हनुमंत कदम-55, 31) उर्मिला धोंडीराम शेडगे-60