Big News । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

Big News । पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan drugs case) साक्षीदार असलेल्या किरण गोसावीला पुण्यातील फसवणूक केल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून भूमिगत होता. (Kiran Gosavi, a witness in Aryan Khan drugs case, is in the custody of Pune police)

 

पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी हा फरार होता. परंतु क्रुजवर एनसीबीने केलेल्या कारवाईत साक्षीदार आणि आर्यन खानची गचांडी धरून त्याला एनसीबीच्या कार्यालयात नेत असल्याचा व्हिडीओ आणि त्यासोबतचा सेल्फी चर्चेत आला होता. पुण्यातील तक्रारदार चिन्मय देशमुख याने तो व्हिडीओ आणि सेल्फी पाहताच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस अलर्ट झाले होते. (Kiran Gosavi, a witness in Aryan Khan drugs case, is in the custody of Pune police)

 

 

पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस देखील बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान यापूर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे.
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्या तो फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला पोहोचले. परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच गोसावी तेथून पळून गेला होता.

 

 

किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. (Kiran Gosavi, a witness in Aryan Khan drugs case, is in the custody of Pune police)

Local ad 1