(bus service) कौठा मार्ग नादेड-मुखेड बससेवा का बंद ः साईनाथ कोळगिरे

कंधार ः  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा अंतर्गत बससेवा बंद करण्यात आली आहे. आता रुग्णस संख्या कमी झाली असून,  ब्रेक द चैन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील सुविधा सुरु केल्या जात आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील बससेवा सुरु करावी, कौठा मार्ग नादेड धावणाऱ्या नादेड व  मुखेड आगाराची बससेवा का बंद आहे,. असा सवाल कंधार भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यानी निवेदनाद्वारे नादेड आगार प्रमुख याच्याकडे यांना केला आहे. (Kautha Marg Naded and Mukhed bus service)

मुखेड -कौठा मार्ग नादेड जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांना जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. नादेड आगारच्या बसेस ३ फेऱ्या तर  मुखेड आगाराच्या बसेस  ४ फेऱ्या अशा एकूण दिवसभरात सात फेऱ्या होतात. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बायाणे, रासायनिक खते व पावसाळ्या आवश्यक साहित्य खरेदीसाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. विशेष म्हणजे ही दुकाने  सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु बससेवा बंद असल्याने मोठी अडचण होत आहे. (Kautha Marg Naded and Mukhed bus service)


 महामंडळच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे याभागातील प्रवाशाचे प्राशांचे हाल होत आहेत. बससेवा बंद असल्याने खाजगी वाहान चालकांनी तिकीट दुप्पट केले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये घरी असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात इतर मार्गांवर  बससेवा सुरु असताना कौठा मार्ग नादेड धावणाऱ्या नादेड व  मुखेड आगाराची बससेवा का बंद आहे, असा सवाल कोळगिरे यांनी उपस्थित केला आहे. (Kautha Marg Naded and Mukhed bus service)


येलुर, कौठा, काटकंळबा, हाळदा, राऊतखेड, धानोरा, तेलुर ,शिरुर, चौकीमहाकाया ,दिंडा – गुंडा, लाडका आदी गावातील नागरिकाना नादेड येथे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.  खरिप हंगामाच्या तोडावर शेतकर्याना शेती उपयोगी साहित्य दवाखाना यासाठी ये जा करण्यासाठी वाहातुक सेवा बंद असल्याने प्रवाशाना अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Kautha Marg Naded and Mukhed bus service)

   

Local ad 1