पुण्यात करुणा शर्मावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे (Social Justice Minister Dhananjay Mundhe) यांच्याबरोबर परस्पर सहमतीने संबंध असलेल्या करुणा शर्मावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा येथे राहणार्‍या एका 23 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. (Karuna Sharma charged with atrocity in Pune)

 

आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ५३० बसेस धावणार

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे रहायला होते. त्यांना एक मुलगी आहे. फिर्यादीचे पती वारंवार तिच्या घरी जाऊन राहू लागले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. तिने विचारणा केल्यावर त्याने तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. मी करुणाबरोबर लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे, असे सांगून फिर्यादीला त्यांच्या आईच्या घरी सोडले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या घरी येऊन फिर्यादीवर पतीने बळजबरी केली. (Karuna Sharma charged with atrocity in Pune)

24 एप्रिल रोजी तिला कार्यक्रमाला जायचे असे सांगून भोसरीला नेले. तेथे करुणा शर्मा हिने हॉकी स्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Karuna Sharma charged with atrocity in Pune)
Local ad 1