पुणे : महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत:च्या जीवनातील जडणघडण अनुभव, टीम मॅनेजमेंट, संघटन कौशल्य यांची माहिती देत प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेव (Cricketer Kapil Dev) हे स्वत:चा जीवनप्रवास उलगडणार आहेत. (Kapil Dev to unfold life journey by encouraging women entrepreneurs)
फिक्की (Ficci) या उद्योजक संघटनेच्या महिला विंगतर्फे महिलांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमास कपिल देव प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Kapil Dev to unfold life journey by encouraging women entrepreneurs)
फिक्की-पुणे ही उद्योजकांची शिखर संस्था आहे. या संस्थेची महिला विंग ही एक आघाडी आहे. तिच्या पुणे अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक नीलम सेवलेकर (Entrepreneur Neelam Sevalekar) यांची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नीलम सेवलेकर या उद्योग-व्यवसायाबरोबरच, सामाजिक क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य करत आहेत. (Kapil Dev to unfold life journey by encouraging women entrepreneurs)
महिला उद्योजका घडवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम उद्योग मार्गदर्शन शिबिर, परिषदा, व मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करून महिला उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आणि संधी निर्माण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Kapil Dev to unfold life journey by encouraging women entrepreneurs)
या पत्रकार परिषदेस महिला विंग अध्यक्ष नीलम सेवलेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर, उपाध्यक्ष पिंकी राजपाल, खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पूनम खोच्चर सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनिस, उषा पूनावाला यांच्या सह पुणे शहरातील फिक्कीच्या प्रमुख पदाधिकारी व उद्योजिका उपस्थित होत्या. (Kapil Dev to unfold life journey by encouraging women entrepreneurs)