(Petrol-diesel price) पेट्रोल-डिझेलच्या दरवाढ विरोधात कंधार युवक काँग्रेसचे आंदोलन

कंधार : देशभरात वाढत चालेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी युवक काँग्रेसने हळदा येथे रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबके साथ, विश्वासघात केल्याची टिका यावेळी करण्यात आली. (Kandhar Youth Congress agitation against petrol-diesel price hike)

भारतीय जनता पक्ष सत्तेत येण्यापुर्वी  30 ते 35 रुपये लीटर प्रमाणे पेट्रोल मिळेल, असे आश्वासन दिले होते. परंतु आज पेट्रोलचे दर 100 रुपये, डिझेल चे दर 80 रुपये प्रति लीटर झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे प्रती बैरलचे दर चाळीस डॉलर इतके ऐतिहासकरित्या कमी झाले आहेत. तेच दर 2014 साली काँग्रेस सरकारच्या काळात एकशे दहा ते एकशे चाळीस बैरल प्रति बैरलच्या आसपास होते. जनतेला वाटले की आत्ता पेट्रोल डिझेल, इंधनाचे दर कमी होतील पण केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर कर वाढवून दरवाढ करत आहे, असा आरोप करण्यात आला. (Kandhar Youth Congress agitation against petrol-diesel price hike)

संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असुन उद्योगधंदे ठप्प आहेत, रोजगाराचा पत्ता नाही, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला बाजारपेठ व भाव नाही, देशातील सप्लाय चेन आधीच अडचणीत असुन या ईंधन दरवाढी मुळे वाहतूक दरात वाढ होऊ महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा रिकामा असून केंद्र सरकार ईंधन दरवाढ करुन जनतेला लूटत आहे. या दरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले असुन, इंधन दरवाढ कमी करावी ,अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.  (Kandhar Youth Congress agitation against petrol-diesel price hike)

यावेळी कंधार लोहा विधानसभा उपाध्यक्ष देवराव पाटील पांडागळे, कंधार काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मनोहर गायकवाड, राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष अशोक पाटील चिखलीकर, डॉ. गणेश पवळे, सरपंच किशनराव शिंदे,सरपंच अवधूत शिंदे, कमलाकर पाटील शिंदे, शरीफ शेख, व्यंकटराव शिंदे, त्रंबक शिंदे, बळवंत शिंदे, उपसरपंच संतोष अंकले, समृत काटेमोड, राहुल ढेमरे, अशोक उत्कुलवाड, हणमंत टोकलवाड, रामकिशन शिंदे, शिवाजी पट्टेवार, निवृत्ती भिसे, जावेद शेख, शंकर कदम, भीमराव शिंदे, पांढरी शिंदे, बिडवे गणेश आदि उपस्थित होते. (Kandhar Youth Congress agitation against petrol-diesel price hike)

Local ad 1