जेष्ठ नागरिक चापसी पोपटलाल शहा यांना न्याय मिळाला पाहिजे – सचिन बगाडे
पुणे. चापसी पोपटलाल शहा वय ७५ हे दादर परिसरात वर्षानुवर्षे राहत असून त्यांचा कापड आणि इतर व्यवयसाय आहे. यांची त्यांच्या नातेवाईकाकडून त्यांच्या असाह्यतेचा व वयाचा गैरफायदा घेऊन त्यांची मालमत्ता बळकावली आहे. तसेच त्यांना त्यांच्या संपत्तीवरून बेदखल केले आहे. या संदर्भात त्यांनी प्रथम माटुंगा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यांनतर कुर्ला येथे न्यायालयात C.C.NO 2373/MISC/2024 नूसर दाद मागितल्या नंतर न्यायालयाने गिरीश खिलजी शहा, विनोद खिमजी शहा,फोरम शहा, निकिता शहा, कल्पना शहा, फईम रईस व असीम रइस, राजेश धनाजी गाला व इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच हा गुन्हा EOW (आर्थिक गुन्हे शाखा) कडे देऊन त्यांनी सखोल तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तरी देखील आर्थिक गुन्हे शाखा मुंबई योग्य पद्धतीने तपास करीत नाही. त्यामुळे सदर जेष्ठ नागरिकास तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे (Sachin Bagade, founder president of Satyashodhak Bahujan Aghadi) यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Justice should be given to senior citizen Chapsi Popatlal Shah – Sachin Bagade)
Related Posts
गेल्या चार महिन्यांपासून सदर व्यक्तींना अटक केली नसून पोलीस प्रशासन तपास अतिशय संथगतीने करीत आहेत .पोलीस याकामी योग्य त्या पद्धतीने तपास करीत नाहीत .त्यामुळे सदर प्रकरणात आपण लक्ष देऊन याचा तपास लवकरात लवकर करून यातील दोषी आरोपीस तात्काळ अटक करावी. अन्यथा चापसी शहा यांना न्याय मिळावा यासाठी आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सचिन बगाडे यांनी दिला आहे.