राजकीय मोठी घडामोड होणार !: महाराष्ट्र विधानसभेचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने, खासदार संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

  • मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शक्यता अधिक बळावली आहे. (Journey of Maharashtra Legislative Assembly towards dismissal)

 

 

शिवसेनेत बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 40 आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. आमदार परत येण्याचा मार्ग व शक्यता संपली आहे. भाजपसोबत जाण्याची अट शिंदे यांनी घातल्याने उद्धव यांनी अखेर सत्ता सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Journey of Maharashtra Legislative Assembly towards dismissal)

 

आदित्य ठाकरे यांनीही यांनी ट्विटरवरील माहितीमधून पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री हा उल्लेख काढून टाकला आहे. केवळ युवा सेनेचे अध्यक्ष असा उल्लेख ठेवला आहे. (Journey of Maharashtra Legislative Assembly towards dismissal)

Local ad 1