ज्येष्ठ पत्रकार रविश कुमारांनी एनडीटीव्हीचा दिला राजीनाम

न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ (NEW DELHI TELEVISION LIMITED) अर्थात एनडीटीव्ही (NDTV) या वृत्त वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय (Prannoy and Radhika Roy) यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’च्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ‘एनडीटीव्ही’चे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रविश यांच्या राजीनाम्यामुळे सोशल मिडियावर त्यांना सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळत आहे.(Journalist Ravish Kumar resigned from NDTV)

 

 

रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याची माहिती, ‘एनडीटीव्ही’कडून बुधवारी जाहीर करण्यात आली. रवीश कुमार १९९६ पासून  ‘एनडीव्हीशी’ जोडले गेले होते. समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती यांची अचूक नस पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. (Journalist Ravish Kumar resigned from NDTV)

 

 

‘रवीश की रिपोर्ट,’ ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून रवीश कुमार मांडायचे. त्यानिमित्त रवीश कुमार यांना सर्वोच्च ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Journalist Ravish Kumar resigned from NDTV)

Local ad 1