Artificial Intelligence । “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स”मुळे नोकऱ्या जाणार
Artificial Intelligence । “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स” (एआय) म्हणजेच कृतिम बुद्धितीमुळे जगभरातील अनेक विभागातील नोकऱ्यांवर गदा येणार आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, काही विभागातील नोकऱ्यांवर काही परिणाम होणार नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. (Jobs will be lost due to “artificial intelligence”)
ओपन एआय (Artificial Intelligence) आणि पेन्सिल्वानिया युनिव्हर्सिटीने (University of Pennsylvania) संयुक्त अभ्यास केला असून, त्यातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. गणिततज्ज्ञ, कर गणना करणारे, अभियंते आणि लेखकांचे काम धोक्यात येणार असल्याचा इशारा या अभ्यासातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनौपचारिक शिक्षण घेऊन नोकऱ्यांना काही फरक पडणार नाही, असे समोर आले आहे. तसेच अंग मेहनत करणाऱ्यांची काम शाबित असणार आहे. (Jobs will be lost due to “artificial intelligence”)
धोक्यात असलेल्या नोकऱ्या : भाषांतरकार, दुभाषी, सर्वेक्षण संशोधक, कवी-लेखक, प्राणी शास्त्रज्ञ, जनसंपर्क विशेषज्ञ, पेब आणि डिजिटल इंटरफेस डिझायनर्स, लिपिक, ब्लाॅकचेन अभियंते, वार्ताहर, मुद्रितशोधक, अकाऊंटंटस् आणि आॅडिटर्स, वृत्त विश्लेषक, पत्रकार, कायदेविषयक सचिव, प्रशासकीय सहायक, क्लिनिक डेटा व्यवस्थापक, वातावरण बदल धोरण विश्लोषक, ग्राफीक डिझायनर्स, गुंतवणूक फंड व्यवस्थापक, विमा मंजूर करणारे आणि वाहनांचे नुकसान ठरवणारे या विभागातील नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.
धोका नसलेल्या नोकऱ्या :कृषी अवजार चालविणारे,क्रीडा स्पर्धक, बस-ट्रकचे मेकॅनिक, डिझेल इंजिन विशेषज्ञ, सिमेंट मिस्त्री,काँक्रीट तयार करणारे, स्वयंपाकी, केशकर्तन, भोजनकक्ष आणि रेस्टाॅरंट अटेंडंट, भांडी धुणारे , विद्युतवाहिन्या टाकणारे तंत्रज्ञ, फरशी बसवणारे, लाकूडकाम मदतनीस, रंगकाम मदतनीस,प्लम्बर, मोटारसायकलींचे मेकॅनिकस रेल्वे रुळ टाकणारे आणि दुरुस्त करणारे आणि टायर मेकॅनिक यांचा समावेश आहे.