Nanded political news । नांदेड : काँग्रेसने महाराष्ट्रातील देगलूर आणि आसाम राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. देगलूरमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. जितेश रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (In Deglur, Jitesh Antapurkar was nominated by the Congress)
देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे याठिकाणी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेसकडून जितेश अंतापुरकर, भीमराव क्षीरसागर यांच्यासह सहा जण निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. (In Deglur, Jitesh Antapurkar was nominated by the Congress)
भीमराव क्षीरसागर यांनी गेल्या काही महिन्यांपासून कार्यकर्ते मेळावे, भेटी गाटी सुरू केल्या होत्या. संपूर्ण देगलूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. तर दुसरीकडे जितेश यांना मतदारांची भावनिक साथ मिळेल, त्यामुळे उमेदवारी त्यांनाच मिळावी, अशी मागणी होत होती. (In Deglur, Jitesh Antapurkar was nominated by the Congress)