Transfers of IAS officers । डॉ. जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हा अधिकारी म्हणून बदली
पुणे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (suhas diwase ias) यांची राज्य सेटलमेंट आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. जितेंद्र डुडी ( Dr. Jitendra Dudi appointed as Pune District Collector ) यांची नियुक्ती करण्यात आली. तर दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती (Santosh Patil appointed as Satara District Collector) करण्यात आली आहे. तर अप्पर जिल्हाधिकारी श्रेणीतील असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत राहिलेले गजानन पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr. Jitendra Dudi appointed as Pune District Collector)
RTE admission process । आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार ?
डॉ.जितेंद्र डुडी यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून तात्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार डुडी यांनी जिल्हाधिकारी पदाची पदभार स्विकारला आहे. 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जितेंद्र डूडी हे झारखंड कॅडरचे होते. परंतु कौटुंबिक कारणांमुळे महाराष्ट्र केडरमधील 2018 बॅचच्या आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी आपला केडर महाराष्ट्र केडरमध्ये बदलला.
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अप्पर जिल्हाधिकारी श्रेणीतील असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत राहिलेले गजानन पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदी बदली झाल्यानंतर तात्काळ पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
संतोष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सायंकाळी सोडून तो अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर अवघ्या तासाभरातच गजानन पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
राज्य सरकारच्या महसूल सेवेतील असलेले गजानन पाटील यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर प्रांत अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही ते पुण्यात कार्यरत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी मंत्रालयात प्रदीर्घ कारकीर्द केली. आज त्यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कोणी कोणाचा पराभव केला?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) की मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची राज्याचे सेटलमेंट आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आयएएस डॉ जितेंद्र हुडी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी कोणाचा पराभव केला याची चर्चा सुरू झाली आहे.