पुणे : अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरीफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, (jeevan pradhikaran) लष्कर, पुणे येथील दोन अभियात्यांनी यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Two Jeevan Pradhikaran engineers arrested for taking bribe)
Trap Case Report
➡ *घटक* :- पुणे
➡ *तक्रारदार* :- पुरुष, ३४ वर्ष
➡ *आरोपी लोकसेवक*
१) किरण अरुण शेटे. वय – ३१, पद- *उप अभियंता यांत्रिकी वर्ग -१*
२) परमेश्वर बाबा हेळकर, वय -४९ पद- *शाखा अभियंता वर्ग -२*,
नेमणूक – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे.
➡ *लाच मागणी व स्वीकार* :- २,५००/-रु
▶️ *पडताळणी दिनांक* :- ३०/०६/२०२२
▶️ *सापळा दिनांक* :- ०६/०७/२०२२
➡ *हकीकत* :- यातील तक्रारदार लेबर कॉन्ट्रॅक्टर असून शिवेगाव ता. खेड येथील अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरीफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, लष्कर, पुणे येथील लोकसेवक शेटे व हेळकर यांनी तक्रारदार यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या २% रकमेची लाच मागणी करून आरोपी लोकसेवक हेळकर यांनी २५००/- रुपये स्वीकारले. (Two Jeevan Pradhikaran engineers arrested for taking bribe)
➡ *सापळा पथक* :-
पोलीस निरीक्षक – प्रणेता सांगोलकर
पोलीस निरीक्षक – भारत साळुंखे
पो.कॉ. भूषण ठाकूर, पो.कॉ.दिनेश माने,
म.पो.कॉ.पूजा पागिरे,
चालक पो.कॉ. चंद्रकांत कदम.
➡ *मार्गदर्शन अधिकारी* :-
राजेश बनसोडे,
पोलीस अधीक्षक, लाप्रवि,पुणे परिक्षेत्र
सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे. (Two Jeevan Pradhikaran engineers arrested for taking bribe)