(blows trumpets against dowry) हुंड्याविरुद्ध इस्लाह-ए-मुआशरा समितीने फुंकले रणशिंग
पुणे : हुंडा ही समाजाला लागलेली किड असून, त्यापासून वाचण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलं पाहिजे. गेल्या काही वर्षात मुलीच्या वडीलांना परंपरेच्या नावाखाली लुबडाले जात आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा भारला पाहिजे. मुस्लिम सामाजात हुंडा घेणे हराम आहे. परंतु ते घेतले जाते. त्यामुळे नागरिकांना हुंडा घेऊ नका, ते शरियतच्या विरोधात आहे. याची माहिती मौलांनामार्फत शुक्रवारच्या नमाजमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवचनातून राज्यभरातील मशिदीमध्ये सांगितले जाणार आहे. (Islah-e-Muashra Committee blows trumpets against dowry)
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या (personal law board in india) इस्लाह-ए-मुआशरा समितीची बैठक रविवारी (दि.7) आनलाईन झाली. त्यात बैठकीला मालेगाव येथून मौलाना अब्दुल हमीद, उमरेज मैफुन रहेमानी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोडचे सदस्य मौलाना निजामोद्दिन फखरोद्दिन, मुफ्ती महुजोद्दिन कासमी, मुफ्ती अब्दुल हमिद यांच्यासह मुंबई, सागली, कराड, नांदेड आदी शहरातून मौलांना सहभागी झाले होते. (Islah-e-Muashra Committee blows trumpets against dowry)
मुस्लीम सामाजात वधू पित्याकडून भेट वस्तू मागने, हुंडा घेणे यासह लग्नात विनाकारण खर्च करायला भाग पाडले जात आहे. ते टाळण्यासाठी समाजात जनजागृती करणे आवश्यक असून, राज्यातील सर्व मशिदींमध्ये इमामांनी किमान तीन शुक्रवारच्या नमाजमध्ये दिल्या जाणार्या प्रवचणात हुंडा घेण, अनावश्यक खर्च टाळण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना समितीने केली आहे. (Islah-e-Muashra Committee blows trumpets against dowry)
मुस्लिम समाजातील लग्नाविषयी नियम घालून देण्यात आलेले आहेत. मात्र, त्याला बगल दिली जात आहे. लग्नातील खर्च वाढत असून, परिणामी अनेक मुली लग्नाविना आहेत. वडिलांना आपल्या मुलीचे लग्न कसे करावे, याची चिंता सतावत आहे. लग्नानंतर पत्नीला वडीलांकडून पैसे व इतर वस्तू अणण्याची मागणी केली जात आहे. त्याविरोधात राज्यातील सर्व मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजमध्ये होणार्या प्रवचनात कमीत-कमी खर्चाल लग्न करणे, त्यामध्ये अनावश्यक खर्च टाळण्याविषयी जनजागृती केली जाणार आहे. (Islah-e-Muashra Committee blows trumpets against dowry)