...

रेल्वेच्या IRCTC तिकीट बुकिंगमध्ये होणार बदल ; जाणून घ्या…

दिल्ली Relve news : रेल्वे प्रवासासाठी मोबाईल ऑप (Mobile aap) द्वारे तिकीट बुक करता येतो. परंतु त्यात दलालांनी (एजेंट) एकाच खात्यावरून अनेक तिकीट बुक करून प्रवाशांकडून अधिकचे पैसे घेतात. त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (IRCTC Booking Update

 

रेल्वेवे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आतापर्यंत एका IRCTC अकाऊंटवरुन एका महिन्यात 6 तिकिटे बुक करु शकता, आणखी तिकिटे बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधारशी लिंक करावे लागेल. पण, आता तिकीट बुकिंगची पद्धत बदलणार आहे. आता नवीन नियमानुसार, फक्त एका तिकिटासाठी, तुम्हाला आधार तपशील द्यावा लागणार आहे. (IRCTC Booking Update)

 

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एकच रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करायला जाल, तेव्हा IRCTC तुम्हाला पॅन, आधार किंवा पासपोर्टची माहिती विचारु शकते. विशेष म्हणजे, IRCTC रेल्वे तिकीट एजेंट तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेतून वगळण्यासाठी ही महत्वाचे पावले टाकणार आहे. IRCTC च्या नवीन प्रणालीवर ज्यामध्ये तुम्हाला तुमचे आधार-पॅन लिंक करावे लागणार आहे. IRCTC वेबसाइट किंवा अॅपद्वारे रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक मागेल, ते देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. (I (IRCTC Booking Update)

 

 

रेल्वे प्रशासनातील दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वे ओळखपत्र दस्तऐवजांना आयआरसीटीसीशी जोडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. तिकीट बुकिंगमध्ये होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी तिकीटासाठी लॉग इन करताना पॅन, आधार किंवा इतर ओळख दस्तऐवजांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आम्ही तिकीट बुकिंगची फसवणूक थांबवू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. (IRCTC Booking Update)

 

आधार प्राधिकरणासोबत आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागताच. त्याची अंमलबजावणी केल्यानंतर आम्ही त्याचा वापर सुरु केला जाणार आहे. सातत्याने तिकीट विक्री करणाऱ्या दलालांवर कारवाई केली जात आहे. 2019 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून 14,257 दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 28.34 कोटींची बनावट तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

 

 

 

Local ad 1