IPS रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (IPS Rashmi Shukla posted as Director General of Police in the state)

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (IPS Rashmi Shukla posted as Director General of Police in the state)

 

 

शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत.

 

 

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर गुरुवारी शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. रश्मी शुक्ला यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

IPS Rashmi Shukla posted as Director General of Police in the state
IPS Rashmi Shukla posted as Director General of Police in the state

 

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.  महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक, आहेत.  सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.

Local ad 1