...

‘संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण !

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे छ. शिवाजी पार्क मैदानावर(Chhatrapati Shivaji Park Ground)आयोजन करण्यात आले आहे. या ‘संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आम्हा निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi ) नेते अॅड प्रकाश आंबेडकर (Ad Prakash Ambedkar) यांनी दिली. (Invitation to Rahul Gandhi for Samvidhan Samman Mahasabha)

 

भारतीय संविधानाने या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित – आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह (Exploited, underprivileged, minorities, Dalits – tribals, OBCs and religious groups)या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar)  संविधान समितीच्यावतीने संविधान सादर केले. व संविधान आणि येणारी परिस्थिती व त्यावरील उपाय यावर उहापोह करणारे भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावे असा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीत झाला आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रण पाठवणार आहोत.  यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील निशाना साधला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका या विकास, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण (Development, Economic Policy, Foreign Policy) इत्यादी मुद्द्यांवर लढवले जाईलच मात्र, आरएसएसचा अजेंडा असा आहे की, इथे आमची व्यवस्था हवी आहे, यातील ‘आमची’ हा शब्द फसवा आहे. ते वैदिक व्यवस्था मानतात. त्यांच्या व्यवस्थेत बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही. आरएसएसला वैदिक धर्मावर आधारित संविधान पाहिजे आहे. आताचे भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे. असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तर त्यानंतर धुळे, सटाणा या ठिकाणी आदिवासी हक्क परिषद मोठ्या संख्येने पार पडल्या होत्या आणि आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील छ. शिवाजी महाराज मैदानावर ही महासभा होणार आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ह्या सभेला अत्यंत महत्त्व आहे. देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असतांना महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संविधानाच्या सन्मानार्थ महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

Local ad 1