विमा सल्लागार होण्याची संधी (Insurance agent) ; द्यावी लागेल मुलाखत

नांदेड : डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन (आरपीएल) योजनेंतर्गत विमा सल्लागारांची (डायरेक्ट एजंट) भरती होणार आहे. त्यासाठी मुलाखती घेतल्या जाणार असून, त्यासंबंधीचे अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर पी. स. माधवराव यांनी दिली. (Insurance agents)

 

Insurance agents will be recruited under Postal Life Insurance (PLI) and Rural Postal Life (RPL) schemes. Interviews will be conducted for this and the applications are available in the office of the Superintendent of Post Office, informed the Superintendent of Post Office, Nanded Division, P. C. Given by Madhavrao.

 

पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार  (Insurance agents) या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. ज्यात केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असावी, अशी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्ज करता येईल.

 

The age of the candidate for the post of PLI and RPL Scheme Agent Insurance Consultant should be between a minimum of 18 years and a maximum of 50 years on the day of interview. The applicant should have passed 10th or equivalent examination in academic qualification. Eligible candidates with central, state accreditation can apply for the interview.

 

इच्छूकांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन शुक्रवार (दि. 30 जुलै) पर्यत कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर नांदेड येथे मुलाखतीसाठी यावे. येतांना सोबत बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे. (Insurance agents)

 

Interested candidates should fill up the prescribed form and come for interview at Superintendent Post Office, Nanded during office hours till Friday (July 30). Be present with biodata, original documents, certificate, experience certificate.

 

 

कोण करुन शकतो अर्ज

श्रेणी-बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबी लक्षात घेतल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षेच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. (Insurance agents)

 

Local ad 1