...

भारतीय नौदलात INS मोरमुगाओ दाखल

INS Mormugao । आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही 15 बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ((INS Mormugao)) ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. (INS Mormugao inducted into Indian Navy)

 

 

आयएनएस विशाखापट्टणमनंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील 4 नौकांची निर्मिती करण्याची घोषणा 2011 मध्ये करण्यात आली होती. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. (INS Mormugao inducted into Indian Navy)

 

भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला. (INS Mormugao inducted into Indian Navy)

 

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) म्हणाले, युद्धनौका आपली ताकद आहे. युद्धनौका तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे कौतुक असून आम्ही त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (INS Mormugao inducted into Indian Navy)

Local ad 1