...

काळजी घ्या : नांदेडमध्ये आढळले पाच कोरोना बाधित (five corona)

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 595 चाचण्यांच्या अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. (Infected five corona found in Nanded)

 

जिल्ह्यात आजवर आजच्या घडीला 50 रुग्ण उपचार घेत असून, यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, मुखेड तालुक्यात 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे हदगाव तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 5 बाधित आढळले. (Infected five corona found in Nanded)

जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मुखेड कोविड रुग्णालयातील 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (Infected five corona found in Nanded)

 

आजच्या तारखेत 50  कोरोनाबाधित सक्रीय रुग्ण आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Infected five corona found in Nanded)

 

Local ad 1