जल, जंगल, जमिनीसाठी भारतीय जैन संघटनेने योगदान द्यावे : शरद पवार

पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक कामात गेल्या चाळीस वर्षांपासून शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे. देशात ज्या ज्या वेळी समस्या आली त्यावेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. भविष्यात जल, जंगल, जमिनासाठी जैन संघटना मोठे योगदान देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. (Indian Jain Sangha should contribute to water, forest and land: Sharad Pawar)