महिला हॉकी संघाला शाहरुखानच्या हटके शुभेच्छा (Indian hockey women team)
Tokyo Olympics 20-2020 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतीय महिला हॉकी संघाने (Indian hockey women team) ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेतील आपले स्थान कायम ठेवत पथकाच्या दिशेन वाटचाल केली आहे. थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला असून, या विजयानंतर देशभरातून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चेकदे इंडिया फेम शाहरुख खानने (Shahrukh khan) देखील ट्विट करत महिला खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन केले आहे.
शाहरुखने ट्विटमध्ये संघाकडून सुवर्णपदकाची मागणी करत शुभेच्छा देताना स्वत:ला माजी प्रशिक्षक कबीर खान असे मजेत म्हटले आहे. भारतीय महिला हॉकी संघावर आधारीत ‘चक दे इंडिया’ चित्रपटात शाहरुखने संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian hockey women team) मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिन (Sjoerd Marijne) याने सर्व महिला संघासोबत एक बसमधील फोटो पोस्ट केला. ज्याला त्याने ‘सॉरी फॅमिली मला यायला अजून वेळ लागेल’ असे कॅप्शन दिले. ज्या फोटोला रिट्विट करत शाहरुखने अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.
Haan haan no problem. Just bring some Gold on your way back….for a billion family members. This time Dhanteras is also on 2nd Nov. From: Ex-coach Kabir Khan. https://t.co/QcnqbtLVGX
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 2, 2021