Indian hockey team : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहा, 41 वर्षानतंर कांस्यपदकावर कोरले नाव

Tokyo olympics 2020 : भारतीय हॉकी संघाने इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात  केली. कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघाने धमाकेदार खेळी करत  ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. अटी-तटीच्या सामन्यात भारताने जर्मनीचा 5-4 अशा फरकाने पराभव केला. (The Indian hockey team made history, winning a bronze medal after 41 years)

 

Tokyo olympics 2020 ः सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल करत जर्मनीने आघाडी घेतली होती. परंतु भारताने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले. भारताचा गोलकिपर श्रीजेशने उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. (The Indian hockey team made history, winning a bronze medal after 41 years)

 

Tokyo olympics 2020 ः भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहने प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. (The Indian hockey team made history, winning a bronze medal after 41 years)

Local ad 1