Income Tax Department। विधानसभा निवडणुकीत पैश्यांच्या वापरावर आयकर विभागाचे लक्ष, नागरीक करु शकतात तक्रार

राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैश्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयकर विभाग सतर्क झाला आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या पुणे कार्यालयाने पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवले जात आहे. याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारी नागरिकांना करता याव्यात यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०३५३ व १८००२३३०३५४ सुरू करण्यात आले आहेत. (Income Tax Department keeps an eye on the money used in assembly elections)