इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अक्सिलेटर मशिनचे लोकार्पण
पुणे : श्री.नरसिंह सरस्वती मेडिकल फौउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट (Indrayani Hospital and Cancer Institute), आळंदी येथे कर्करोग (Cancer) रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन अक्सिलेटर मशीन (Accelerator Machine) इनस्टाॅल करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) सीएसआरच्या चेअरमन शेफाली बजाज यांच्या हस्ते कऱण्यात आले. (Inauguration of Accelerator Machine at Indrayani Hospital and Cancer Institute)
नवीन अक्सिलेटर मशीचा कर्करोग असलेल्या रुग्णांना लाभ होणार आहे, अशी माहिती इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युट, आळंदीचे मुख्य विश्वस्त व प्रमुख कॅन्सर सर्जन डॉ. संजय देशमुख (Cancer surgeon Dr. Sanjay Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Inauguration of Accelerator Machine at Indrayani Hospital and Cancer Institute)
मशिनच्या लोकार्पण प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर (State Chief Secretary Nitin Karir), बजाज फिंसर्व सीएसआरचे प्रमुख अजय साठे, डॉ. संजय देशमुख, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. चारूशिला देशपांडे, अनिल पत्की, डॉ. भुषण झाडे, ब्रिगेडियर डॉ. राजीव जोशी, डॉ. मंजिरी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. (Inauguration of Accelerator Machine at Indrayani Hospital and Cancer Institute)
डॉ. संजय देशमुख म्हणाले, श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फौउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी येथे हे धर्मदाय हॉस्पिटल आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कॅन्सर पेशंटवर उपचारांसाठी २०१२ साली येथे प्रथम येथे लिनियर अक्सीलेटर मशीन बसवण्यात आले. पहिल्या वर्षी ३००, मागील वर्षी १३ हजार तर यंदाच्या वर्षी १ हजार दोनशे ७१ पेशंट वर या मशिनच्या माध्यमातून उपचार केले गेले.
या अत्याधूनिक मशिनच्या खरेदीसाठी बजाज फिंसर्व कंपनीने अर्थसहाय्य केले आहे. या मशिनाच्या माध्यमातून कॅन्सर पेशंटवर रेडिएशन थेरपी कऱण्यात येते. आमच्याकडे जवळपास ९० टक्के शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात. तसेच येथे केमो थेरपी, लहान मुलांवरील कॅन्सरचे उपचार हे देखील मोफत केले जातात. मागील वर्षी या सेंटरमध्ये जवळपास १३ हजार कॅन्सर पेशंटवर मोफत उपचार करण्यात आल्याचे डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
तसेच हाॅस्पिटल मध्ये नुकताच एक पेडिएॅट्रिक म्हणजे लहान मुलांचा कर्करोग विभाग सुरू करण्यात आला आहे व मार्च अखेर एंडोस्कोपी विभाग सुरू होणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.