विधानसभा निवडणुकीमुळे लाडक्या बहिणींना पैशासाठी करावी लागेल प्रतिक्षा ! निवडणूक आयोगाने दिले महत्वाचा आदेश
Ladki Bahin Yojana Update : मध्य प्रदेशच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरलेली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरू शकणारी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती आली आहे. पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. निवडणूक आयोगाने ही योजना तात्पुरती बंद केली आहे. विशेष म्हणजे आतापरपर्यंत राज्यातील जवळपास २.४ कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. मात्र, पुढील हप्त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Important updates about Ladaki Bahin Yojana)
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या काळात मतदारांना थेट प्रभावनित करणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशानंतर महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेचा पैसा रोखला आहे. यामुळे पुढील दोन महिने या योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाही. यामुळे आता या महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. याद्वारे महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते. यासाठी आतापर्यंत जवळपास २.४ कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला होता. याबरोबरच पुढील महिन्याचे पैसे ही दिले जाणार होते. याची महिला वाट पाहत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक काळात या योजनेचे पैसे पाठविण्यावर बंदी आणली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली होती. त्यांना प्राप्त झालेल्या माहितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला जात असल्याचे समोर आले होते. यामुळे या योजनेची विस्तृत माहिती मागविण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच या योजनेचा पैसा रोखण्यात आल्याचे विभागाने निवडणूक आयोगाला कळविले आहे.