महत्त्वाची अपडेट : पुणे शहरासह जिल्ह्यात रेडअलर्ट जारी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महत्वाचे निर्देश
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सिंचन विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Important Update Red alert issued in Pune district)
.
खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1819736176758001743?t=pzrE_sbTHL3qzmmp2QguBA&s=19
सर्व जिल्हाधिकार्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.