...

मला दिल्लीत पाठविण्यामध्ये अब्दुल सत्तारांची महत्वाची भूमिका : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : औरंबादमधून शिवसेनेच खासदार राहिले आहे. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले.  (MIM’s Imtiaz Jalil in Lok Sabha elections) त्यामुळे जलील खासदार झाले कसे याविषयी सातत्याने चर्चा होत असते. परंतु खासदार जलील यांनी मला खासदार म्हणून दिल्लीत पाठविण्यामध्ये महाविकास आघाडीतील मंत्री अब्दुल सत्तार यांची महत्वाची भूमिका असल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली. (The important role of Abdul Sattar in sending me to Delhi)

 

 

 

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा गावातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात इम्तियाज जलील बोलत होते. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते. शिवसेनेच्या महसूल मंत्र्यांनी एमआयएमच्या खासदाराला निवडून दिल्याचे हे वक्तव्य समोर आल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार हे काँग्रेस सोबत होते. (The important role of Abdul Sattar in sending me to Delhi)

Local ad 1