ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी..

खर्च सादर करा अन्यथा सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी ठराल अपात्र

पुणे : राज्यातील सुमारे सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात सदस्य आणि सरपंच पदासाठी हजारो उमेदवारांनी निवडणुक लढवली. आता उमेदवारांना निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर करायचा आहे.जर वेळेत खर्च सादर न केल्यास पुढील सहा वर्ष कोणते ही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरु शकता. त्यामुळे वेळेत खर्च सादर करुन निवांत व्हा… (Important news for candidates contesting Gram Panchayat elections..)

 

जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Important news for candidates contesting Gram Panchayat elections..)

दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. (Important news for candidates contesting Gram Panchayat elections..)

निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब  २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबत ची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे. (Important news for candidates contesting Gram Panchayat elections..)

Local ad 1