तुम्ही उद्योजक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या का महत्वाची

नांदेड : जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2021 या वर्षासाठी  28 फेब्रुवारी 2022 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही अर्ज करु शकता. (This news is important for you if you are an entrepreneur) 

 

 

नांदेड जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी (By small entrepreneurs in Nanded district) सोमवार 28 फेब्रुवारी 2022 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड (Industry Center Nanded) यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे. (This news is important for you if you are an entrepreneur)  

रोख रकमेसह होणार सन्मान

उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते. (This news is important for you if you are an entrepreneur)

नियम व अटी जाणून घ्या…

जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकांना यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.

Local ad 1