Yellow alert। हवामान खात्याने जाहीर केला यलो अलर्ट
Yellow alert । परतीचा पाऊस पाठ सोडायला तयार नाही. तर दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 17 आणि 18 ऑक्टोबरला राज्यातील काही जिल्ह्यात यलो आलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Maharashtra Rainfall) पडण्याची शक्यता आहे.पुण्यात सकाळपासूनच रिमझिम पाऊस होत आहे. (IMD announced yellow alert in some districts of the state)
मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरीही तो राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागातून निघाला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद होत आहे. गेल्या बारा दिवसांत राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी म्हणजे 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. (IMD announced yellow alert in some districts of the state)
या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान या पावसाने झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.