बेकायदा वाहतूक होत असलेल्या मळीचा टँकर जप्त

पुणे ः मद्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मळीची बेकायदा वाहतूक होत होती. पुणे-मुंबई या महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावरून (From Versoli toll plaza on Pune-Mumbai highway) मळीसह टँकर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाने जप्त केला आहे. (Illegally transported sludge tanker caught)

 

 

अजमेरसिंग रामकिशनसिंग हरीयाना (Ajmer Singh Ramkishan Singh Haryana) असे अटक केलेल्या आरोपीचे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात  उभे केले असता 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  (Illegally transported sludge tanker caught)

 

 

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकच्या अधिकार्‍यांना  बेकायदा मळीची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.  त्यानुसार पुणे-मुंबई या महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर सापळा लावण्यात आला होता. यावेळी संशयित वाहनांची तपासणी केली जात होती. त्याचवेळी सुमारे किंमत 21 लाख 50 हजार रुपये किंमतीचा भारत बेंझ कंपनीचा टँकर 14 टायर (एचआर 55 एबी 2571) येताना दिसला. त्यावेळी टँकर थांबविण्याच्या सूचना चालकाला करण्यात आली. टँकरची झडती घेतली असता, त्यामध्ये मळी साठा हा परदेशात निर्यात करण्याच्या नावाखाली घेतलेली मळी इतरत्र अवैध ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. त्यामध्ये 25 मेट्रिक टन ज्यांची सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.  (Illegally transported sludge tanker caught)

 

 

 

ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (Excise Commissioner Kantilal Umap), पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे (Prasad Surve, Deputy Commissioner, Pune Division), पुणे जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे  (Pune District Superintendent Santosh Jhagde) यांच्या  मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1 पुणे यांनी केली आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एल. पाटील, विठ्ठल बोबडे, संजय सराफ, व दुय्यम निरीक्षक बी.एस. घुगे, एम.आर.राठोड, दीपक सुपे व श्रीमती स्वाती भरणे, व कार्यालयीन स्टाफ, चंद्रकांत नाईक, सुरज घुले, गणेश वावळे, अंकुश कांबळे, मुंकुंद पोटे, जयराम काचरा व राहुल जोंजाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.(Illegally transported sludge tanker caught)

 

Local ad 1