बावधनमध्ये गावठी दारुचा (liquor) साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुणे : बंगल्यातून गावठी दारु विकाऱ्या महिलेसह एका पुरुषाला 1900 लीटर गावठी दारुसह ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्प्यात 35 लीटर क्षमतेचे 55 बॅरल गावठी दारु जप्त केली. (Illegal Liquor Stocks confiscated) त्याठिकाणावरुन दोन चारचाकी वाहनेही एकूण दोन लाख 41 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने केली आहे.
प्राप्त माहीतीनुसार बावधन (बु) परिसरातील क्षत्रियनगर मधील त्रिशा बंगल्यात दारुचा साठा असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाला मिळाली होती. त्यानुसार छाप्पा टाकण्यात आला. त्यात 35 लीटर क्षमतेचे 30 प्लॅस्टिक कॅन मिळून आले. (30 plastic cans with a capacity of 35 liters were collected) तर बंगल्यातील पार्किंगमध्ये असलेल्या एम.एच. 14 एक्स. 4744 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनात 35 लीटर क्षमतेचे दहा कॅन मिळून आले. याठिकाणा वरुन विवेक मुकुटसिंग रजपूत (वय-41, रा. बावधन बु.) याला अटक केली आहे. (Illegal Liquor Stocks confiscated)
आरोपिकडे केलेल्या चौकशीत भुंडे वस्ती येथील बिंदीया अनिल रजपूत यांच्या घरात गावठी दारू असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी टाकलेल्या छाप्प्यात 35 लीटर क्षमतेचे 15 कॅन आणि त्याठिकाणी उभी असलेल्या एम.एच.12 एल.जे.1279 या क्रमांकाच्या वाहनातून पाच कॅन मिळून आले. याठिकाणावरुन बिंदीया रजपूत (वय 46. रा. बावधन) हिला अटक केली आहे. (Illegal Liquor Stocks confiscated) गावठी दारूच्या सेवनाने जीवितहानी होण्याची शक्यता असून, त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक संतोष झगडे, उपअधिक्षक संजय आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, राजाराम शेवाळे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, गणेश केंद्रे, रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर, दत्तात्रय आबनावे, निलम पिंगळे, शायीन इनामदार, शामल धुमक यांच्या पथकाने हि कारवाई केली. (Illegal Liquor Stocks confiscated)