मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास तरीही करु शकता मतदान ; १२ प्रकारचे पुराव्यापैकी एक ओळखपत्र हवे

 

पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार छायाचित्र ओळखपत्र (Voter Photo ID Card) जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक मूळ पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती बारामती विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले. (If you do not have a voter photo ID for voting, you can still vote)

 

महाराष्ट्राच्या विकासासाठी  महायुतीला निवडून द्या – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण 

मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (Job Card), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (Health Insurance Smart Card), वाहन चालक परवाना (Driving license), स्थायी खाते क्रमांक (PAN card), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (Passport), छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रात मोबाईल बंदी

मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नावडकर यांनी केले आहे.
Local ad 1