...

IAS Tukaram Mundhe Transfer । तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, कुठे झाली नियुक्ती जाणून घ्या…

IAS Tukaram Mundhe Transfer : आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा वेळा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत.

 

 

तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe Transfer) यांची आज पुन्हा बदली झाली आहे, त्यांची श्रीर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 16 वर्षात त्यांची तब्बल 19 वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे.

 

 

आतापर्यंत झालेल्या बदल्या..

ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – 2022 – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
29 नोव्हेंबर 2022 –  साईबाबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Local ad 1