...

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढील आठवड्यात होणार बदल्या ?

मुंबई : राज्यात सध्या बदल्यांचे वारे वाहत असून, टप्प्या-टप्प्याने अधिकाऱ्यांच्या आदेश निघत आहेत. दरवर्षी  मे महिन्यात बदल्या होत असतात. आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली तर काहींच्या बदल्या झाल्या. तीन वर्षाचा एकाच ठिकाणी कार्यकाळ पुर्ण करणाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात मंत्रालयातील आणि राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officers Transferred in Maharashtra) पुढील आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

मागील आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारतर्फे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानंतर काही आयएएस अधिकारी आणि गुरुवारी महसूल आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर बदल्या करण्यात आले आहेत.

 

 

२० अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवडाभरात केल्या जाणार आहेत. विविध टप्प्यांत या बदल्या जाहीर केल्या जातील. या बदल्यांमध्ये मंत्रालयाव्यतिरिक्त इतरही काही बदल्या केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय पोलिस दल, महसूल विभागासह (Police Force, Revenue Department) सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) आणि गृहनिर्माण विभागात (Department of Housing) या बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

अधिकाऱ्यांची वाढली धाकधूक

शासनाच्या वतीने नियमित बदल्या केल्या जात आहेत. त्यात विशेष बाब म्हणून ही अधिकाऱ्यांचे स्वतंत्र्य आदेश काढले जात आहेत. तर काहींचा तीन वर्षांचा कालावधी हा संपण्यासाठी 6 महिन्यापेक्षा अधिक काळ शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनाही आपली बदली होईल, अशी भिती वाटत आहे. तसेच नियमित होत असलेल्या बदल्यांमध्ये आपल्या कोणत्या विभागात जावे लागेल, यावरून अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
Local ad 1