विद्यार्थ्यांना भेटून मला आनंद मिळतो : अमृता फडणवीस

बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद

 

पुणे : “भारतीय जैन संघटनेच्या (BJS) वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील (Educational Rehabilitation Project of Jain Association of India) विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते. विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो,” असे प्रतिपादन अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी केले. (I enjoy meeting students : Amrita Fadnavis)

 

 

 

भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पास (BJS) भेट व विद्यार्थ्यांशी संवाद अमृता फडणवीस यांनी साधला. यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शालिनीताई विखे पाटील, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, अरुण नहार, विलास राठोड तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (I enjoy meeting students: Amrita Fadnavis)

 

 

 

या संस्थेचे विद्यार्थी रामेश्वर सुब्बनवाड आयएएस, अक्षय भोरडे आयएफएस झाल्याबद्दल व इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि या प्रकल्पातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शालिनीताई विखे पाटील, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे जगन्नाथ पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मेंटल हेल्थ रिपोर्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

‘विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो. त्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. या शैक्षणिक संकुलातील शिक्षक-कर्मचारी, शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. येथील धम्मरत्न गायकवाड या विद्यार्थ्याला ९२ लाखाची जपानची मिळालेली शिष्यवृत्ती, एकाला मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार, एकाने क्रीडाक्षेत्रात मिळवलेले सुवर्णपदक, एकाने देशातील महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश पाहता या संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध होते,’ असे गौरवोद्गार अमृता फडणवीस यांनी काढले.

 

‘नाशिकला जिल्हाधिकारी असताना कोरोनाकाळात आईवडील दगावून अनाथ झालेल्या ४० मुलांचा शोध घेतला. त्यांना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी विविध महसुली अधिकाऱ्यांनी घेतली. बीजेएस संस्था राज्यभरातील अनाथ, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

 

 

 

शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘बीजेएसने १९९३ च्या लातूर भूकंपातील अनाथ झालेली, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची, आदिवासी, निराधार, कोविडग्रस्त कुटुंबातील अशा हजारो मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे.’ अमृता फडणवीस नेहमीच येथील मुलांवर भरभरून प्रेम करतात. त्यांना नेहमी भेटायला येतात, त्यांची आपुलकीने चौकशी करतात. याबद्दल मुथ्था यांनी विशेष आभार मानले.

 

अमृता फडणवीस यांचे बीजेएस पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांवर विशेष प्रेम आहे. २०१६ साली संस्थेत येऊन त्यांनी मुलांशी संवाद साधला होता. त्यांना मुंबईलाही घेऊन गेल्या होत्या. यावेळीही त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. स्वतः अनेक मुलींना जिलेबी भरवली. काही लागलं तर फोन करा म्हणून आपला मोबाइल नंबर दिला. अनेक मुलींसोबत सेल्फीही काढला. पुन्हा मुंबईला घेऊन जाणार असल्याचं सांगितल्यावर मुलांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.(I enjoy meeting students: Amrita Fadnavis)

Local ad 1