मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही !

अहमदनगर : राज्य मंत्रिमंळाने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा (wine sale in supermarkets) निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्हांला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचे आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो असून, त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असा इशारा किशन बाबूराव हजारे उर्फ अण्णा यांनी दिला आहे, (I don’t want to live in your state! ः Anna Hazare)

 

 

 

 

राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) प्रतिनिधींनी अण्णा हजारे यांच्याशी वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाबाबत चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी ग्रामसभा बोलावली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात दारू कमी आहे? बीयर बारचे दुकाने आहेत ना. परमिट रुमही आहेत. वाईन शॉपीचे दुकानेही आहेत. त्यात वाईन मिळते ना? तुम्ही परत दुकानात का ठेवता? सुपर मार्केटमध्ये का ठेवता? एवढी दुकाने असताना आणखी का ठेवता? सर्व लोकांना व्यसानाधिन करायचे आहे का? लोक व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचे ते साधून घ्यायचे असा काही डाव आहे का? अरे व्यसानाने बरबाद झाले ना लोक. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे. ही बालकं व्यसनाधीन झाली तर काय होणार?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला. (I don’t want to live in your state! ः  Anna Hazare)

 

 

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात विक्री ९Sales in supermarkets and grocery stores) केल्यास महाराष्ट्रातील बालके, तरुण महिला आणि मुलींवर खूप अन्याय अत्याचार होतील. म्हणून मी सरकारला निरोप पाठवला. सरकारचे लोक चर्चेला आले. मी सगळं ऐकले. मी त्याला उत्तर म्हणून एकच सांगितले. तुमचे ऐकले. आता माझा सरकारला एक निरोप द्या. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही. एवढा निरोप सांगा. मी असे म्हटल्यावर सरकारने हालचाली सुरू झाल्या. तुम्ही वाईन का आणता आणि खुल्या बाजारात का विक्रीला ठेवता? म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही, असा हजारे यांनी दिला आहे.  (I don’t want to live in your state! ः  Anna Hazare)

Local ad 1