...

मला एकनाथ खडसेंच्या सीडीची (CD) प्रतिक्षा : राज ठाकरे

पुणे | भोसरी भूखंड प्रकारणात राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (ncp leader eknath khadse) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  (Enforcement Directorate) नुकतेच चौकशीसाठी बोलावले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, से वक्तव्य खडसे यांनी केले होते. मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याचीच वाट पाहत आहे, (I am waiting for Eknath Khadse’s CD) असे सांगत ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला. 

 

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे (Mns chief Raj thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी इडीची कारवाई आणि केंद्र सरकाविषयी भाष्य केले आहे.
राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
 पुणे महापालिका निवडणुकीसाठी  (Pmc election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला लागली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. आज आणि उद्या ते पुण्यात मुक्कामी आहेत. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.

 

काय आहे प्रकरण? (bhosari midc land scam)

भोसरी येथे सर्व्हे क्र. ५२ हिस्सा २ अ/२ या मिळकतीवरील २१ आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी (रा. कोलकता) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सौफुद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम फक्रुद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, साकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला व इतर वाटेकरी आहेत. सुमारे ४० वर्षांपूर्वी उकानी यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली. ती परत मिळावी, म्हणून उकानी यांनी आठ सप्टेंबर २०१५ मध्ये हायकोर्टात याचिका केली. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर उकानी यांनी एमआयडीसीला न कळविताच ही जमीन खडसे कुटुंबीयांना विकली होती. हेच जमिन खरेदी विक्रीचे प्रकरण खडसे यांच्या राजकीय जीवनाला डाग लावणारे ठरले आहे. (I am waiting for Eknath Khadse’s CD)

Local ad 1