Kalyani Nagar Porsche car accident । अजीत पवार म्हणाले, मी पोलीस आयुक्तांना कायमच फोन करतो ; आमदार सुनील टिंगरेची केली पाठराखण

 

पुणे. कल्याणीनगर पोर्शो कार अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पहिल्या दिवसांपासून राष्ट्रवादी कांग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी ससूनचे डॉ.अजय तावरेला मॅनेज करण्यासाठी 14 फोन केल्याची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजीत पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मैन पोळले होते. दरम्यान, अजीत पवारांनी पुणे पोलिस आय़ुक्तांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. त्यावर अजीत पवार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) मी कायमच फोन करतो. मात्र , अपघात प्रकरणासाठी मी फोन केलेला नाही. पुण्यातल्या अपघातानंतर दोषींवर योग्य कारवाई करा असे मी सांगितले होते. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते माझे कामच आहे असे अजित पवार म्हणाले. (I always call the Commissioner of Police; Allegations against MLA Sunil Tingre are false: Ajit Pawar)

 

 

 

पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने आलिशान कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, पब चालक, व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली. यानंतर या आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली. दरम्यान, पोर्श कार अपघात घडला त्यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. यावर सुनील टिंगरे यांनीही खुलासा करत हे आरोप फेटाळले. यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत आमदार सुनील टिंगरे यांचा यामध्ये सहभाग आहे की नाही? याबाबत बोलत आमदार सुनील टिंगरे यांची पाठराखण केली आहे.

 

 

 

“पोर्श कार अपघात प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आरोपीला जामीन मंजूर झाला. तो जामीन बाल न्यायमंडळाने दिला होता. ही घटना घडल्यानंतर जी कलमे लावण्याची आवश्यकता होती, ती लावण्यात आली. ज्यावेळी या घटनेतील चौकशीला सुरूवात झाली त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

 

 

 

अपघाताची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. या भागातील आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विरोधकांनी काही आरोप केले. आता आमदार मतदारसंघात असतात. त्यांच्या मतदारसंघात काही घडलं तर त्यांना तेथे जावं लागतं. त्यांच्याच मतदारसंघात काही काही दिवसांपूर्वी स्पॅल कोसळल्याची घटना घडली होती. त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला होता. तेव्हाही आमदार सुनील टिंगरे तेथे पोहचले होते. लोकप्रतिनिधी या नात्याने मदत केली. पुण्यात काही घटना घडतात, त्यावेळी पुण्यातील सर्व प्रतिनिधी मदत करतात. ही अपघाताची घटना घडली, त्यानंतर त्यांना कोणाचा फोन आला? याबाबत आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले. मात्र, त्यांनी कोणालाही पाठीशी घातलेले नाही”, असे अजित पवार म्हणाले. आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की त्यांनी दबाव आणला, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसे कुठेही झालेले नाही. सुनील टिंगरे यांच्यावर जे आरोप होत आहेत, ते आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगत अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखन केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

मुलाच्या बापाला, बापाच्या बापालाही अटक केली

“पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई झाली अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येते आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. एकूणच हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. रोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही”, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

 

 

 

 

Local ad 1