इंग्रजांच्या आशिर्वादने हैद्राबाद राज्यात निझामाने प्रचंड हैदोस घालवला होता. या राज्यातील जनता प्रचंड हालअपेष्टा सहन करीत होती. आशातच इ.स. १९२१ मध्ये हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा उभारून हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग फुंकण्यात आले. (Hyderabad blew the horn of freedom struggle!)
लोहा येथील प्रणव गजानन रुद्रवार [रा.लोहा,नांदेड]
MBBS 2nd Year BJ Medical College & Sassoon GH Pune. यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची आठवण करून देणारा लेख…
विजया दशमीच्या मुहूर्तावर विश्वनाथ रामचंद्र होनाळकर यांच्या वाड्यात ‘प्राव्हेटस्कूल’ नावाने ही शाळा उघडण्यात आली. १९२१ ला आशा ध्ययानेच प्रेरीत होऊन कार्यास प्रारंभ करणे म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती. जीव गहाण ठेऊन व घरावर तुळशीपत्र ठेऊन हे काम करावे लागे.सुरवातीला शाळेत अनंतराव काका व गणेशसिंग मास्तर अशी राष्ट्र प्रेमाने ओतप्रोत भरलेले दोन शिक्षक होते. या शाळेचे उद्दीष्ट म्हणजे राष्ट्रासाठी जगणारे आणि राष्ट्रासाठीच आपल्या प्राणाची आहुती देणारे सुशिक्षित तरुण तयार करणे होते. निझामाच्या दडपशाहीच्या काळात हिप्परगा ता लोहारा जि. उस्मानाबाद (महाराष्ट्र राज्य) येथील शाळेसारखी वास्तू उभारण सोपं काम नव्हत. व्यंकटराव देशमुखांनी निझामाला न डगमगता आपल सर्वस्व पणाला लावल तर व्यंकटरावाचे धाकटे बंधू अनंतराव देशमुख व गोपाळराव देशमुख या दोघांनी आपल्या सर्व संपत्तीचे शाळेच्या नावे दानपत्र केले. केवढी मोठी राष्ट्रभक्ती ! या कुटुंबाने जणू राष्ट्रभक्तीचे वृत्तच आंगीकारले होते.
घरादाराची राख रांगोळी होईल, सर्वांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा होईल या सर्वांचा विचार न करता हैद्राबाद च्या स्वातंत्र्य लढण्याच्या यज्ञकुंडात मारलेली ही असाधारण उडी होती. या सर्वांना या तरुण कार्यकर्त्यांमध्ये कुशल राष्ट्रप्रेमाचे बीज पेरून हैद्राबाद संस्थानला अखंड हिन्दुस्तानात सामील करायचे होते. हिप्परगा हे गाव आडवळणी माळावर परंतु या शाळेमुळे हे गाव हैद्राबाद सह मुंबई प्रांताच्या प्रकाश झोताता आले. या शाळेमध्ये सरस्वती मातेच्या उपासने सोबतच स्वातंत्र्य देवतेची उपासना केली जात असल्याने या शाळेची ख्याती सर्वदूर पसरली. सर्वच पालकांची अशी इच्छा होई लागली की, आपली मुले येथे (या शाळेत) शिकावीत आणि मातृभूमीच्या संरक्षनासाठी पुढे यावीत कारण येथील जनता शेकडो वर्षांपासून निजामाची चाकरी करत होती. त्यांनाही आता स्वाभिमानाने जगण्याची नवी आशा, प्रेरणा निर्माण झाली.या शाळेसाठी गरीब श्रीमंत प्रत्येक जन आपआपल्या परीने देणगी पाठवू लागला. यातूनच ७८ खनाची शाळेची सुंदर इमारत उभारली गेली. विश्वनाथ रामचंद्र होनाळकर यांनी शाळेसाठी दोन एकर शेतीचे दानपत्र व एक हजार रुपये दिले. यात एक एकर बागायती शेतीही होती. यातून शाळेत शेतकी शिक्षणाची ही सुरुवात झाली. हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत बॉम्बे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण सुरू झाले. दीडशे ते दोनशे विद्यार्थी दररोज शिकू लागले. ((Hyderabad blew the horn of freedom struggle!)
‘खरा धर्म देशार्थ हा जीव द्यावा’ या सारखी राष्ट्रप्रेमाने उजळून नेघलेली सुंदर गीते या शाळेत ऐकायला येऊ लागली. आणि खर्या अर्थाने हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाचे बीज येथेच पेरले गेले. या आदर्श शाळेचे नियंत्रण तथा मार्गदर्शन नेतृत्व मुख्याध्यापक म्हणून श्री व्यंकटेश भगवानराव खेडगीकर (रा. शिमगे ता. शिंडगे जि. बेलापुर राज्य कर्नाटक) हे करत होते. म्हणून या शाळेत कमी कालावधीतच अपेक्षित निकाल दिसत होता. कारण श्री व्यंकटेश भगवानराव खेडगीकर म्हणजेच आपले सर्वांचे दैवत आदरणीय ध्ययेवेडे,राष्ट्रप्रेमी ‘स्वामी रामानंद तीर्थ’ हे स्वतः होते.
हैद्राबाद सस्थांनातील प्रजा जुलमी राजवटी खाली भरडली जाऊ लागली. निजाम स्वत:ला तुर्की घराण्याच्या मुघल वंशातील हिंन्दुस्तानातला नेता व येथील हिंन्दुधर्मीय जनतेला गुलाम समजू लागला . कुली कुतुबशहाने हैद्राबाद शहरात चारमिनारवर मशिदी बरोबर एक हिंदुंचे देवालय देखील बांधले होते. पण शेवटचा निजाम उल-मुल्क यांच्या कार्यकाळात हिंन्दु धर्माबद्दलची ही आदराची भावना व संस्थांनातील एकात्मता नष्ट झाली होती. (Hyderabad blew the horn of freedom struggle!)
इ.स. १९३८ मध्ये हैद्राबाद संस्थानाचे लोहपुरुष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली पाच सत्याग्रहींणी पहिला सत्याग्रह केला आणि निझाम विरोधी चळवळीला खरी गती यायला सुरुवात झाली. स्वामीजींच्या नेतृवाखाली हैद्राबाद स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह,विनायकरावजी विद्यालांकर, पंडित नरेंद्रजी बन्सिलालजी यांच्या नेतृत्वाखाली आर्यसमाज संघटना,विद्यार्थ्यांचा वंदेमातरम सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह आशा एकामागून एक स्वातंत्र्याच्या मशाली पेटू लागल्या. संस्थांनातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याची आणि पारतंत्र्य संपण्याची आशा वाटू लागली. सरहद्दीवरील मोक्याच्या ठिकाणी शिबीर (कॅम्प) उभारण्यात आले.स्वातंत्र्य भारतातील जनतेकडून शस्त्रे पुरवण्यापासून इतर सर्व गोष्टींमध्ये सहकार्य मिळू लागले. हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाला आता खरी गती प्राप्त झाली होती.
स्वातंत्र्य संग्रामाला तीव्रता आली आणि ४ डिसेंबर १९४७ च्या रात्री ८ वाजता हैद्राबाद आकाशवाणीवर एक बातमी धडकली.’एक सरफिरे नौजवानने अल्हाहजरत हुजूर निजामाकी चलती गाडीपर हातबाम फेका’. पण दुर्दैवाने तो बॉम्ब निझामाच्या गाडीला लागून खाली पडला व निझाम वाचला. हे शौर्य दाखवले होते नारायण बाबू यांनी. निजामावर बॉम्ब फेकण्याची मोहीम अत्यंत विचारपूर्वक आखली होती. जर निजाम या नारायण बाबूच्या हल्यातुन वाचला तर पुढे गंगाराम व जगदीश हात बॉम्ब व रिव्हलवर घेऊन उभेच होते. परंतु दुर्दैवाने निझामाच्या चालकाने गाडी मागे वळवली व तो बालबाल बचावला. निजामची कर पुढे आली नाही तेव्हा काम पूर्ण झाल्याचे समजून ते दोघे भूमिगत झाले. नंतर निझामी पोलिसांनी नारायण बाबूंचा अत्यंत छळ केला.
१५ ऑगस्ट १९४७ ला होन्नली जि. बिदर या गावात भाऊराव पाटलांनी तिरंगा ध्वज फडकवला ! निझामाला ही बातमी समाजतच त्याने निझामी पोलिस पाठवले. पोलिस पाटलांना शिवीगाळ करू लागले तेव्हा पाटील गेले आणि त्यांनी त्या पोलीसच्या थोबाडीत लगावली व त्यांना आपल्या प्रचंड वाड्यातील कोपर्याच्या खोलीत डांबून टाकले. ही वार्ता हिसामोद्दीन या अमिनसाबला ठाण्यावर समजली आणि तो रागाने लालभडक झाला. (Hyderabad blew the horn of freedom struggle!)
इ.स. १८०० मध्ये मीर अकबर अलिखान सिकंदर दखन आसफ उल-मुल्क यांने इंग्रजाशी तैनाती फोजेचा तह केला होता. तेव्हाच निजामाचे अस्तीत्व संपल्यासाखे होते. परंतु तो स्वतःला अजुनही स्वतंत्र राज्याचा अधिपती समजत होता. व्हाईसराॅयची परवानगी घेतल्या शिवाय निजामाला कोणतेच पाऊल उचलता येत नव्हते. तरीही आपण एका स्वातंत्र इस्लामी राष्ट्राचे अधिपती आहोत असा त्याचा दावा होता. परंतु याचा परिणाम असा की, संस्थांनातील जनतेला गुलामाचा गुलाम म्हणून वावरावे लागे.
हिन्दु समाज हा विस्कळीत असल्यामुळे निझाम १३% मुस्लिम धर्मियांच्या आधारे हैद्राबाद एक स्वातंत्र्य इस्लामिक राष्ट्र म्हणून चालवत होता.निजामाच्या मदतीला संस्थानात ‘दिनदार सीद्दीकी संघटना’, ‘निजाम सेना’, ‘ठाकसार पार्टी’ आणि ‘रजाकार’ या संघटना काम करत होत्या. निजामाला बॅरिस्टर जीनाने हैद्राबाद संस्थानात लक्ष घालावे ही संकल्पनाच मुळात आवडत नव्हती.या सर्व संघटनामध्ये ‘रझाकार’ ही संघटना अत्यंत बलवान व अत्यंत जुलमी प्रवृत्तीची होती. रझाकार म्हणजे स्वखुशीने काम करणे परंतु, या संस्थांतील रझाकार प्रजेला लुटण्यासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी स्वखुशीने काम करीत होती असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
लातूरचा वकील ‘कासीम रझवी’ हा या ‘रझाकार’ संघटनेचा संस्थापक होता. कासीम रझवीने १९४८ पर्यत दोनलक्ष सशस्त्र रझाकराची फौज उभारली होती. यामुळे पोलिस व रझाकार यांच्या अन्यायात जनता भरडुन निघत होती. इ.स.१९४७ मध्ये हैद्राबाद संस्थानचे पंतप्रधान लायकअली झाले. ते कासीम रझावीचे मित्र होते. आतातर रझवीच्या अन्याय अत्याचाराला आणखीनच उत आला होता.कासिम रझवी हा अविवेकी व उद्दाम माणूस होता. रझाकार संघटनेच्या जोरावर बळावर त्याने हैद्राबाद संस्थांवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. कासीम रझवीच्या भाषणातून हिन्दु विरोधी द्वेष ओसंडून वाहत होता.
हिसामोद्दीन हा हिन्दुचा कर्दनकाळ होता. भाऊराव पाटलांना धडा देण्यास तो व त्याचे साथीदार आले खरे मात्र पाटील व त्यांचे साथीदार निसटले. होन्नाली या गावात चंगीजखाॅन, रझाकार, पोलीसांसह अल्लाउद्दीन खिलजी याच्या वंशातील हिसामोद्दीन यांनी अत्याचार करायला सुरुवात केली. घराघरातून जनतेवर भयभीत करणार्या किंचाळया ऐकायला येवू लागल्या मात्र अब्रू रक्षणासाठी गावाच्या रक्षणासाठी कोण धाऊन येणार! ही वार्ता भाऊराव पाटलांना समजली आणि त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले. अबलांची अब्रू लुटून रझाकार टोळी बरोबर हिसामोद्दीन गाड्या घेऊन गैडगावकडे निघाले. धनुरा गावाजवळ गाड्या आल्या एका आडवळणावर जाळी झुडपात दडून बसलेल्या भाऊराव पाटील व त्यांच्या कडव्या सोबत्यांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या ! तशा अंधारात भाऊरावने हिसामोद्दीनची गाडी हेरली आणि त्याच्यावर गोळी झाडून हिसामोद्दीनचा हिसोब चुकता केला.
भाऊराव आपल्या लोकांबरोबर स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत वागदरी कॅम्पवर येऊन दाखल झाले ! संस्कृतीहीन राजवटीत क्रुर अत्याचाराने हैद्राबाद संस्थांनातील जनता पेटून उठली होती. इकडे राजकारणाची सर्व सुत्रे कासीम रझवीने आपल्या हाती घेतली होती. व तो आता स्वतःला मुजहिरे आजम इस्लाम धर्मात्मा असे म्हणून घेत होता.कासीम रझवीच्या या सर्व अत्याचाराच्या सर्व भयानक घटना निझामाच्या कानावर येत असतानाही त्याने कानात बोटे घालून आपल्याला काही माहीतच नाही असे सोंग करी संस्थांनातील सर्व प्रजा आपल्याला पुत्रासाखी आहे असे नाटक करीत होता. निजाम आपल्या प्रजेला उद्देशून म्हणे,“हिंदू व मुसलमान माझ्या दोन्ही डोळ्यांइतके मला प्रिय आहेत नव्हे ते माझे दोन डोळेच आहेत असे निजाम सर्वसमोर बोलत असलातरी “डेक्कन कल्चर शिका” असा त्याचा रयतेला दिलेला सल्ला होता याचाच अर्थ म्हणजे निजामाच्या पोटात एक आणि ओठातं एक होते. निजामाने मुस्लिम धर्मियांनी हिंदूंना भावासारखे वागावावे गावात शांतता राहावी या उद्देशानेच `ओमान कमिटी` ( शांतता कमिटी). स्थापना करण्याचा एक ढोंगी कार्यक्रम चालू केला होता.
निझामाला आपली ताकत किती , विरोधकाचे ताकत किती, कोणासोबत यूद्ध झाल्यास लढण्याचे आपली शक्ती किती आहे याचे थोडेही भान राहिले नव्हते. निझामाची सत्ता पुर्णपणे खीळखिळी झाली होती. ज्यांनाखरी परिस्थिति समजली होती अशा अलियावर जंग, महेदीनवाज जंग मंजूरयार जंग, एवढेच नव्हेतर युवराज मौजम शहा आणि निझामाच्या पत्नीने भारतात विलीन होण्याचा विचार निझामाकडे मांडला होता परंतु निझाम कोणाचेच ऐकायला तयार नव्हता.’शाहे उस्मान जिंदाबाद’ च्या जय घोषात पुर्णपणे तल्लीन झाला होता.